बुलंद शहर सिटीलाईन न्यूज नेटवर्क जाहगिंराबाद येथील बुलंद शहरमध्ये कारमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचा जळून मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट कार पुलाला धडकली आणि रस्त्याच्या कडेला ५ फूट खाली कोसळली. खाली पडताच कारमध्ये आग लागली. कारमध्ये बसलेल्या ६ पैकी ५ जण जिवंत जळून खाक झाले.
या अपघातात कारमपील फक्त एक महिला बचावली. पुलाला धडकल्याने ती कारमधून खाली पहली, तिथे दोन्ही पाय तुटले. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा समावेश आहे. या अपघातात पत्नीचा भाऊ आणि त्याची पत्नी यांचाही मृत्यू झाला आज पहाटे ५.३० वाजता
जहांगीराबाद पोलीस ठाणे परिसरातील जानीपूर चांदौस चौकात हा अपघात झाला. हे कुटुंब बदायूंमधील यमनपुरा (सहस्वान पोलिस ठाणे येथील रहिवासी होते. ते पहाटे ३.३० वाजता शिफ्ट करने दिल्लीला निघाले होते.
देन जोडप्याचा आणि एका मुलाचा मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वीज (वय २६), त्याची पत्नी निदा (वय २३),
तन्वीची बहीण मोमिना (वय २४), मेहुणा जुबैर (वय ३०) आणि मोमिनाया २ वर्षाचा मुलगा जैतुल यांथा अपघातात मृत्यू झाला. तन्वीजची
बहीण गुलनाज उर्फ भुरो गंभीर जखमी झाली आहे. गुलनाजला झांगीराबाद दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे
