संगमनेर प्नतिनिधी -शिक्षणासाठी संगमनेर चाळीसक्रोशीत नामांकित आणि गौरवाकिंत ठरलेल्या शहरातील ज्ञानमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाविद्यालयात पहिल्या दिवशी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करत सर्वांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
आजच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून सावरगाव तळ गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक
वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. ज्ञानमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य फादर फ्रान्सिस
पटेकर यांनी मार्गदर्शन करताना विविध उदाहरणे देऊन,जीवन जगताना वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे विविध उदाहरणे देऊन ज्ञानमाता विद्यालयाची शिस्त अभ्यासाचं महत्त्व आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री फटांगरे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. संदीप सातपुते यांनी केला आणि आभार उपप्राचार्या सौ.अर्चना डोंगरे यांनी मानले.कार्यक्रम प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक फादर प्रशांत शाहूराव तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी शारदा नवले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
