नाशिक दिनकर गायकवाड दोन लाख रुपये देण्यास नकार दिला म्हणून एका संघटनेच्या कार्यकत्यनि साथीदारांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांची बदनामी करून त्यांना मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी बाळारराहेब गोविंद ठाकरे (रा. कॉलेज रोड, नाशिक) हे नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विस्तार अधिकारी म्हणून काम पाहतात.आरोपी नितीन विष्णू सातपुते (वय ३८, रा. कोणार्कनगर, पंचवटी, नाशिक)
याने छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र या संघटनेचा मुख्य संघटक असल्याचे सांगून व छावा संघटनेच्या लेटर पेंडवर वेळोवेळी फिर्यादीसह जिल्हा परिषदेत शासकीय नोकरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीबाबत माहिती अधिकाराचे अर्ज करून माहिती मागविली. त्यानंतर स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावून फिर्यादीच्या वरिष्ठ कार्यालयात फिर्यादी विषयी खोटे अर्ज सादर केले,तसेब सदर अर्जात औरंगाबाद येथे प्रशिक्षण
घेतल्याचे खोटे व बनावट पत्र तयार करून त्या अर्जात समाविष्ट केले. या अर्जात काही एक तथ्य नसल्याचे बौकशी अंती निष्पन्न झाले असतानाही आरोपी सातपुते याने पुन्हा बळजजबरी करून त्यासंबंधाने स्थानिक वृत्तपत्रात व यूट्यूब चॅनलला बातम्या प्रसारित करून
ठाकरे यांना मानसिक त्रास दिला, तसेच हे प्रकार थांबविण्याच्या बदल्यात आरोपी सातपुते याने ठाकरे यांच्याकडून फोन पे यांच्याकडून २५ हजार रूपये व ३० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. त्याचप्रमाणे साक्षीदार किशोर रमेश शिरसाळे यांच्याकडून फोन पेद्वारे १२ हजार व ३२ हजार रुपये रोख स्वरूपात वसूल केले.
त्यानंतर त्याने पुन्हा दोन लाख रूपये मागितले असता ठाकरे यांनी त्याला नकार दिला.आरोपीने त्याच्या साथीदारांसह दि. २७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने आंदोलन करून त्यांना मानसिक त्रास दिला. हा प्रकार दि. २० ऑक्टोबर २०२४ ते दि. २८ मे २०२५ दरम्यान जिल्हा परिषदेच्या कार्यालयात घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपी नितीन सातपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
