नाशिक दिनकर गायकवाड -त्याग, बलिदानाची शिकवण देणारी बकरी ईद (ईद उल अञ्हा) शहारासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. त्र्यंबक रोड येथील ऐतिहासिक शहाजहाँनी ईदगाह मैदानात आज सकाळी सामूहिक नमाज पठणाचा सोहळा पार पडला
यंदाही बकरी ईद 'जिलहिज' या उर्दू महिन्याच्या दहा तारखेला साजरी होत आहे. ईदगाह मैदानात आज झालेल्या सामूहिक नमाज पठणाच्या सोहळ्याचे नेतृत्व परंपरेनुसार शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफणी यांनी केले.
ईदगाह में दानासह उपनगरांतील मशिदी मध्येही नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते.काल 'जुम्मा'च्या विशेष नमाज दरम्यान सर्व मशीदींमधून धर्मगुरूंनी बकरी ईद साजरी करण्याबाबत प्रवचनातून माहिती दिली. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पोलीस, मनपा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
तसेच शहर-ए-खतीब यांच्याकडूनही सुत्री मरकजी सिरत समितीद्वारे परिपत्रक काढण्यात आले असून त्याचेही वाचन शहरातील मशीदींमाये करण्यात आले.
आज सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहाजहाँनी इदगाह मैदानाकडे जाणारी गडकरी चौक व अण्णा भाऊ साठे चौका पासूनपुढे जीपीओ रोडवर सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आल्याने कुठेही वाहतूक कोंडी अथवा फारशी गैरसोय होऊ नये
म्हणून शहर वाहतूक शाखेकडून या परिसरातील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष सुनिल केदार, युवक काँग्रेसचे सरचिटणीस स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.
