संगमनेर प्नतिनिधी दळणवळणासाठी शहरातील उपनगरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा स्वामी समर्थनगर ते संतोषी माता मंदिर दरम्यानच्या म्हाळुंगी नदीवरील पूलाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
गत चार वर्षांपूर्वी म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल कोसळला होता तेव्हा अधिकारी आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
या पुलाचे काम करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली.आज अखेर आमदार अमोल खताळ त्यांच्या मार्फत त्यांच्या आंदोलनाला यश आले त्यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती. या पुलाचे रविवारी उद्घाटन झाले आ. अमोल खताळ म्हणाले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले होते.
काही वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा पूल कोसळला.महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल मंत्री व विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या पुलाच्या नव्या कामास मंजुरी मिळाली होती.
विशेष म्हणजे, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या नव्या पुलाचे उद्घाटन झाले, हा एक सकारात्मक योगायोग ठरला असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. म्हाळुंगी नदीवरील पूल पडल्याने गेल्या चार वर्षांपासून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे.
आमदार खताळ यांनी दोन वेळा या पुलाची पाहणी करून ठेकेदारांना दर्जेदार कामासाठी सूचना दिल्या होत्या.अल्पावधीत हे बांधकाम पूर्ण करून नागरिकांसाठी पूल खुला करण्यात आला.या उद्घाटन सोहळ्याला नीलम खताळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी
रामदास कोकरे, महायुतीचे ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, अविनाश थोरात, कैलास लोणारी, कैलास वाकचौरे, रामभाऊ राहणे, संदीप देशमुख, सागर भोईर, अल्पना तांबे, उषा कपिले, कांचन ढोरे, कावेरी नवले, दिपाली वाव्हळ, रेखा गलांडे, पूनम अनाप, दिनेश फटांगरे,
विनोद सूर्यवंशी, लखन घोरपडे, सौरभ देशमुख,
शौकत जहागीरदार, कैलास कासार, संपत गलांडे, राहुल भोईर, शशांक नामन, सुशील शेवाळे, मुजफ्फर जहागीरदार, सुयोग गुंजाळ, तुषार ठाकूर, या पुलाचे बांधकाम करणारे ठेकेदार राऊत, अजित गुंजाळ, गौतम शाह, शैलेश मंडलिक, जमशेद मिर्झा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साईनगर, घोडेकर मळा उपस्थित होते.
