नाशिक दिनकर गायकवाड दुकानात काम करणाऱ्या ड्रायव्हर व अकाऊंटंटने संगनमत करून दुकानमालकाच्या मोटारसायकलीसह दहा लाखांची रोकड असा सव्वादहा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विनोद अशोक कंदोई (रा. एअर गोल्डन होरायझन स्कूल, बोधलेनगर, नाशिक) यांचे नातेवाईक रिंकू बन्सीलाल मिराल व ड्रायव्हर जगतपाल बुधराम सिंग हे फिर्यादीच्या घरून दहा लाखांची रोख रक्कम असलेली बॅग घेऊन एमएच १५ जेएस या वाहनाने ऑफिसला येत होते.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रिंगू, मित्तल हा दत्तमंदिर येथील मोटवानी रोडवरील दि लोगो या दुकानातून जपण्यासाठी टाकलेले टी शर्ट घेण्यासाठी गाडीतून उतरून दुकानात गेला, त्यानंतर गाडीत राहिलेली पैशांची बॅग पाहून आरोपी बालक जगत्पाल सिंग हा तेथून गाडी पेऊन पळाला. ही गाडी पुणे
रोडवर लावून गाडीतून पैशांची बॅग घेतली. त्यानंतर त्याचा चुलतभाऊ व या दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करणारा सुशील शिशुपाल भाट याला बोलावून घेतले.
दोघांनी मिळून फिर्यादीची पैसे असलेली बॅग व मोटारसायकल चोरी करून पळून गेले. हा प्रकार नुकताच नाशिकरोड येथे घडला. याप्रकरणी उपनगर पोलीस टाण्यात दोघा नोकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
