क्रांतीदिप नव्या पिढीसाठी प्रेरणादायी-पद्मश्री पवार

Cityline Media
0
क्रांतीदीप पुस्तकाचे अहिल्यानगरात उत्साहात प्रकाशन
अहिल्यानगर प्रतिनिधी परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे अतिशय कमी राहिलेले असून ध्येय आणि निष्ठेने काम करणाऱ्या जुन्या पिढीतील कॉ.बाबा अरगडे हे सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या अनेकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत, कॉम्रेड अरगडे  त्यांचे हे काम पुढच्या पिढीला कळावं या दृष्टीने क्रांतीदीप कॉम्रेड बाबा अरगडे यांचे कार्य नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना आदर्श घेण्यासारखे आहे,असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
डाव्या आणि पुरोगामी चळवळीमध्ये कायम अग्रेसर असलेले, हमाल पंचायत व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला वाहून घेतलेले कॉम्रेड बाबा अरगडे रगडे यांच्याबद्दल विविध संस्था व संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या "क्रांतीदीप : कॉ.बाबा अरगडे" या पुस्तकाचे प्रकाशन हमाल पंचायत भवन मध्ये जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष अरुण कडू पा
 यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच पार पडले,त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विचारपीठावर आ. संग्राम जगताप, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेअविनाश पाटील, ज्ञानदेव पांडुळे,सुधीर टोकेकर, संजय खामकर, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना पद्मश्री पवार म्हणाले की, कॉ.बाबा अरगडे हे चालतं बोलतं व्यासपीठ असुन अनेक चळवळींचे ते मार्गदर्शक आहेत, त्यामुळे क्रांतीदिप हे नाव या पुस्तकासाठी सार्थ ठरत आहे. 
अविनाश पाटील म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ वाढवण्यासाठी आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कॉम्रेड बाबांचे सहकार्य लाभलेले आहे. 

ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, पुरोगामी विचार सांगण्या बरोबरच जगण्याचे ही धाडस बाबांनी दाखवलेले आहे,त्यामुळे ते चळवळीतील कार्यकर्त्यांचे आदर्श आहेत. 

हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यावेळी बोलताना म्हणाले की,शंकरराव घुले अण्णांच्या नंतर हमाल पंचायतला मार्गदर्शन करणारे नेतृत्व म्हणजे बाबा.कोणताही लढा लढण्यासाठी बाबाच्या वैचारिक उंचीचा फायदा चळवळीला होतो.त्यामुळेच हमाल पंचायतचे काम आम्ही अण्णांच्या नंतर पुढे नेत आहोत. 

अध्यक्षपदावरून बोलताना अरुण कडू पाटील म्हणाले की, प्रगतिशील विचारांच्या कार्यकर्त्यांची एकजूट निर्माण करण्याचे काम कॉम्रेड बाबा यांनी केलेले आहे,जेष्ठ पासून तर  नवोदिता पर्यंत बाबांचा संपर्क दांडगा आहे. सर्वच क्षेत्रात त्यांचे योगदान असल्याने क्रांतीदीप कॉम्रेड बाबा अरगडे  नाव सार्थ आहे. शब्दगंध चळवळीने पुढाकार घेऊन प्रकाशित केलेले क्रांतीदिप कॉ. बाबा आरगडे गौरव ग्रंथ नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. 

यावेळी शाहीर भारत गाडेकर यांनी भलरी गीत गाऊन कार्यक्रमासची सुरुवात केली. यावेळी बापूसाहेब भोसले, मा. प्राचार्य डॉ.जी पी ढाकणे,सुभाष सोनवणे प्रा.डॉ. अशोक कानडे, ॲड.रंजना गवांदे,अशोक सब्बन, कॉ. आनंद लोखंडे, हरिभाऊ नजन, चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत, प्राचार्य डॉ,अशोक ढगे, डॉ अशोक दौंड, आनंदा साळवे, भगवान राऊत, राजेंद्र फंड,बबनराव गिरी, पॉल भिंगारदिवे, बी.के.चव्हाण सौंदाळ्याचे सरपंच शरद अरगडे, कॉ. भारत आरगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले तर शेवटी संजय महापुरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!