नाशिक दिनकर गायकवाड महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय मार्फत इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राज्यभरात प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली असून राज्यभरातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालये आणि उम्र माध्यमिक शाळांनी प्रथम फेरीसाठी नोंदणी केली आहे.
एकूण उपलब्ध २१ लाख २३ हजार ४० प्रवेश क्षमतेपैकी १८, लाख ९७ हजार ५२६ जागा कॅप फेरीसाठी तर २ लाख २५ हजार ५१४ जागा विविध कोटांतर्गत राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. कोटांतर्गत (इन-हाऊस, व्यवस्थापन, अल्पसंख्यांक) प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना दि.१२ ते १४ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी थेट संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल https://mahafyjcadmissions.in तसेच हेल्पलाईन क्रमांक ८५३०९५५५६४ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
