अहिल्यानगर प्रतिनिधी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथे आमदार सत्यजीत तांबे यांनी सदिच्छा भेट देत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालक मंडळासह अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार केला.
या प्रसंगी त्यांनी शिक्षक बांधवांशी विविध शैक्षणिक व सामाजिक मुद्द्यांवर सुसंवाद साधला. तसेच शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली.