जनसुरक्षा विधेयक विरोधात राज्यव्यापी निदर्शने, उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Cityline Media
0


अहिल्यानगर प्नतिनिधी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४' हे घटनाबाह्य आणि लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करत,आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत आझाद मैदानावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध डाव्या आणि लोकशाहीवादी पक्ष- संघटनांनी हे विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी हा लढा उभारला आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून,अहिल्यानगरमध्ये ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हे विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

यापूर्वी, २२ एप्रिल रोजी राज्यभरात ७८ ठिकाणी तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शने झाली होती. या विधेयकाविरोधात राज्यभरातून १२,२०० हून अधिक हरकती दाखल झाल्या असूनही, विधीमंडळाच्या समितीने कोणालाही प्रत्यक्ष म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही, यावर आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

हे विधेयक प्रशासनाला अवाजवी अधिकार देऊन नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे अशी माहिती पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी सुधीर टोकेकर आणि कॉ. सुरेश पानसरे अशोक सब्बन यांनी केले आहे 

यावेळी बाळासाहेब पालवे,भारती न्यायपेल्ली,संगीता कोंडा, शारदा बोगा,प्रिती कोटा, सगुना श्रीमल, लक्ष्मीबाई कोटा, रेखा बोगा, यांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!