नाशिक दिनकर गायकवाड घराच्या परिसरात उभ्या असलेल्या दोन रिक्षांसह एक दुचाकी ही वाहने अज्ञात इसमाने पेटवून देत त्यांचे नुकसान केल्याची घटना गंजमाळ येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नदिम सलिम खान (रा. पंचशीलनगर, गंजमाळ) हे रिक्षाचालक असून, त्यांनी राहत्या घराजवळ एमएच १५ झेड ९१३२ व एमएच १५ झेड ९२६४ या क्रमांकांच्या रिक्षांसह एमएच १५ जेएफ ३३१३ या क्रमांकाची एक मोटारसायकल अशी तीन वाहने उभी केली होती. ही तीनही वाहने अज्ञात इसमाने कशाच्या तरी सहाय्याने जाळून त्यांचे नुकसान केले आहे.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.
