- पाथर्डी गावातून आमिष दाखवून मुलीचे अपहरण
नाशिक दिनकर गायकवाड अज्ञात इसमाने एका मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची घटना पाथर्डी गावात घडली.
फिर्यादी व त्यांची सासू अशा दोघी जणी घराच्या समोरील ओट्यावर भांडी घासत होत्या, त्यावेळी त्यांची मुलगी घरात टीव्ही पाहत होती.
फिर्यादी व त्यांची सासू भांडी धुऊन घरात गेल्या असता त्यांना त्यांची मुलगी घरात दिसून आली
नाही. त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केलाः मात्र ती मिळून आली नाही.
या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले, अशी फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
