अहमदाबाद सिटीलाईन न्यूज नेटवर्क विमान अपघातामध्ये २४२ प्रवाशांपैकी केवळ एकाचा जीव वाचला आहे. केवळ काही सेंकदात झालेल्या या अपघातात रमेश विश्वकुमार नेमका कसा वाचला, हे त्यानेच सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे जाऊन जखमींची विचारपासू केली. रमेश विश्वकुमार याच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.
रमेश विश्वकुमार जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रमेश विश्वकुमार म्हगाला की, विमानाने टेक ऑफ झाल्यानंतर एका मिनिटाच्या आतच प्लेन क्रॅश झाल्याचे जाणवत होते. त्यानंतर प्लेनमध्ये ग्रीन आणि व्हाईट लाईट ऑन झाल्या. परंतु उड्डाणासाठी एनर्जी मिळत नसल्याचे जाणवत होते
रमेश विश्वकुमार पुढे सांगतो, प्लेन क्रैश झाले. पण मी ज्या साईडाला होतो ती साईट हॉस्टेलवर कोसळलीच नव्हती. हॉस्टेलच्या ग्राऊंड फलोअरवर मी आदळलो.माझे डोअर तुटल्यानंतर मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्यात मी यशस्वी झालो. मी बाहेर पडलो.दुसऱ्या बाजूला कुठूनच वाहेर पडण्यासाठी जागा नव्हती मी कसा वाचलो हे मलाच सांगता येत नाहीये.माझ्या नजरेच्या समोरच्या एअर होस्टेस आगीच्या ज्वाळांमध्ये अडकल्या होत्या. आग लागली तेव्हा माझा डावा हात भाजला
मी स्वतः हुन प्लेनमधून बाहेर पडल्यानंतर रुमणवाहिकेने मला हॉस्पिटलमध्ये आणले. येथे माझ्यावर योग्य रित्या उपचार सुरु आहेत.
अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या विमान अपघातामध्ये २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १२ क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. हे विमान ज्या हॉस्टेलवर कोसळले, हे डॉक्टरांचं हॉस्टेल होते. इमारतीमधील साधारण ५० जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे ज्या कंपनीचे हे विमान होते, त्या एअर इंडियाने विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय जे लोक जखमी आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च कंपनी करणार आहे.
