नाशिक दिनकर गायकवाड
भाजीपाला येऊन घरी जाणाऱ्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र व मोबाईल मोटारसायकलीवरून आलेल्या पतीनू बळजबरीने खेचून नेल्याची पटना पाथर्डी फाटा येथे पडली.
फिर्यादी वैशाली पांडव (रा. प्रबुद्धनगर, पाथर्डी गाव) ही महिला पाथर्डी गावातील भाजी बाजारातून भाजीपाला व इतर साहित्य घेऊन घराकडे पायी जात होत्या. त्यावेळी अहिल्या मातानगर येथील गल्लीत अचानक महिलेचा पती संतोष भीमराव पांडव हा त्याच्या मोटारसायकलीवरून महिलेसमोर आला.
त्याने महिलेला चापटीने मारहाण करून ४५ हजारांचे मंगळसूत्र व ४ हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने खेचून मोटारसायकलीवरून निघून गेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
