अधर्माच्या सावलीतील हिंदू धर्म — एक सत्य शोध
आत्ताचा दिसणारा हिंदू धर्म हा धर्म नाहीच, तो अधर्माच्या आधारावर उभा आहे.
आजचा हिंदू धर्म हा वैदिक, अवैदिक, शैव, नाथ, बौद्ध, जैन अशा अनेक तत्त्वधारांचा एक संमिश्र भास आहे.जर यातून वैदिक बाजू पूर्णपणे बाजूला काढला, तर उरतो तो अवैदिक धर्म, जो अधिक मानवी,अधिक समतेचा आहे.पण दुर्दैवाने आज अनेक हिंदूंना "धर्म" आणि "अधर्म" यातला फरक समजतच नाही; या प्रश्नांचा विचार करायची बुद्धीही नाही.
धर्माच्या नावाखाली अधर्माचा खेळ वाईट विचारसरणीला, जातिवादाला,अंधश्रद्धेला धर्माचा मुखवटा घालून मोकळं झालं जातं.वैदिक लोकांनी बौद्ध धर्मापेक्षा श्रेष्ठ ठरवण्यासाठी गोमांस भक्षण बंद केलं, हे स्पष्ट लिहिलं आहे – ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथात गाय भाजून खाण्याची कृती दिलेली आहे.आणि हेच लोक आज धर्म शिकवतात — हे किती मोठं हास्यास्पद आहे!
*खरा धर्म कोणता?खरा अवैदिक धर्म तोच जो समतेला,बंधुभावाला, माणुसकीला, प्रेमाला महत्व देतो
ज्या धर्मात तर्क आहे,चिकित्सा आहे, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आहे, तोच खरा धर्म चमत्कार, स्वर्ग, नर्क, आत्मा, ब्रह्म, पुनर्जन्म यांसारख्या वैदिक भ्रामक कल्पना — ह्या धर्म नव्हेच.आमचे कोण? वैदिक की अवैदिक? म्हणूनच वैदिक काहीही आपले नाही!
आमचे खरे आराध्य अवैदिक कुलस्वामी – महादेव, बुद्ध आहेत.त्यांच्या शिकवणी मानवी आहेत, विज्ञानवादी आहेत.जिथे सर्वांना स्थान होतं – अगदी किन्नर, गरीब, दलित, अस्पृश्य, रोगी यांनाही – तेच खरे कल्याणकारी ठिकाण होते.तेथे वैदिक अधर्माला तसूभरही वाव नव्हता! माणुसकीचा,विज्ञानाचा अवैदिक धर्म स्वीकारा! मानवतावादी, विज्ञानवादी, समतावादी अवैदिक धर्म आणि विचार स्वीकारा, पुढे चला!
अंधश्रद्धा, भेदभाव, चमत्कार, कर्मकांड, कल्पनांची गुलामगिरी सोडा.
– सत्यशोधक महेश शिंदे
कराड जि.सातारा
Mo.7057801271
