प्रवरानगर प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील कडीत बुद्रुक येथील गुड शेफर्ड इंग्लिश मेडीयम स्कुल या ठिकाणी जागतिक पितृ दिन उत्साहात आणि चैतन्यदायी वातावरणात साजरा करण्यात आला.
भारतीय संस्कृतीत आई आणि वडिलांना जगात उच्च स्थान आहे,आपल्याला घडवताना गुरु समवेत त्यांची तुलना केली जाते नुकत्याच झालेल्या पितृ दिनाच्या पार्श्वभूमीवर गुड शेफर्ड विद्यालयात जागतिक पितृ दिन विद्यार्थ्यानं समवे साजरा करतांना अनेकांनी उपस्थिती दर्शविली. या वेळी विद्यालयाचे व्यवस्थापक सायमन जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य रुबी जॉर्ज व सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्तिथ होते. प्रसंगी विद्यार्थ्यांनी बनवलेले शुभेच्छा भेट कार्ड आपल्या पालकांना भेट म्हणून देण्यात आले आपल्या पाल्याकडून भेट कार्ड स्विकारताना पालकांच्या चेहऱ्यावर एक सुखद आनंद जाणवत होता या कार्यक्रमात अनेक पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असे स्तुत्य कार्यक्रम या पुढेही विद्यालयात साजरे करून शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचे सतत प्रयत्न राहील असे मत विद्यालयाचे व्यवस्थापक सायमन जॉर्ज यांनी आपल्या शुभेच्छा भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
