पोरक्या झालेल्या मुलांना जनहित प्रर्वतक ठरलेल्या परिसस्पर्श फाऊंडेशन,रंगलहरी कलादालन,ओमसाई कलादालन यांचा मदतीचा हात
श्रीरामपूर दिपक कदम तालुक्यातील भोकर येथील भोईटे दाम्पत्यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पोरक्या झालेल्या दोन चिमुरड्याच्या भवितव्यासाठी राहुरी येथील परिसस्पर्श फाउंडेशन,श्रीरामपुर येथील रंगलहरी कलादालन आणि ओमसाई कलादालन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या रंगरेषा मदात्तीच्या या उपक्रमास कला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
गुरू चित्रकार भरतकुमार उदावंत यांच्यासह चित्रकार रवी भागवत दिवसभर शंभरहून अधिक कला रसिकांची अर्कचित्र रेखाटून या मुलांसाठी निधी उभा केला. या उपक्रमात अहमदनगर आकाशवाणीचे प्रसिद्ध निवेदक संतोष मते परिसस्पर्श फाउंडेशनचे अनिल येवले, चित्रकार रमेश मोरे, हरी झडे, सतीश ढोकणे, दिनेश पवार, संतोष चोळके, श्रीरामपुर येथील अशोकराज आहेर, अभय जोर्वेकर यांच्यासह असंख्य ज्ञात अज्ञात व्यक्तीचे मोलाचे सहकार्य लाभले.प्रसंगी सर्वांचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
