आश्वी प्रतिनिधी:-संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील जुन्या पिढीतील धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संत पुंजाआई यांच्या सानिध्यात राहीलेल्या कलावती पांडुरंग क्षिरसागर यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ८७ वर्ष होते .
त्यांच्या पश्चात दोन मुले सुना तिन मुली जावई पुतणे नातवंडे असा मोठा परिवार आहे .येथील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक शामराव क्षिरसागर,संजय क्षिरसागर यांच्या त्या मातोश्री तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्विय सहाय्यक व संगमनेर तालुका जनसेवा कार्यालय प्रमुख सुजित क्षिरसागर महेश क्षिरसागर अजित क्षिरसागर संदिप क्षिरसागर प्रसाद क्षिरसागर यांच्या त्या आजी होत त्यांच्या निधनाने आश्वी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
