नाशिक दिनकर गायकवाड"आम्ही सीबीआय ऑफिसर आहोत, गळ्यातील सोन्याची चेन व अंगठ्या काढून ठेवा," असे सांगून दोन अनोळखी इसमांनी हातचलाखी करून चार तोळ्यांचे दागिने लांबविल्याची घटना दत्तनगर येथे पडली.
फिर्यादी मनोहर किसन पुमणे (रा. ठक्कर बिल्डिंगशेजारी, दत्तनगर, पेठ रोड) हे सेवानिवृत्त असून, ते देवदर्शना करिता जात होते.दत्तमंदिर गेटजवळ दोन
अनोळखी इसमांनी संगनमत करून घुमणे यांना जवळ बोलावले. "आम्ही सीबीआय ऑफित्तर आहोत. तिकडे गळ्याला चाकू मारून अंगावरच्या सोन्याची चोरी होते. तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठ्चा काढून ठेवा," असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादींनी गळ्यातील ६० हजारांची तीन तोळ्यांची सोन्याची चेन, ४० हजार रुपयांच्या एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्वया तीन हजार रूपये
किमतीची चांदीची एक अंगठी असे दागिने काढून हातात घेतले.त्यावेळी अनोळखी इसमांनी फिर्यादीस हातरुमाल देऊन तो फिर्यादीच्या खिशात ठेवल्याचे भासवून त्यातील १ लाख ३ हजार रूपये किमतीची चेन व अंगठ्या हातचलाखीने काढून घेत त्यांची फलावणूक केली.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इत्तमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
