धाराशिव सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदाथचि सेवन करून थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कड़क कारवाईची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.तीन महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदीची शक्यता आहे. संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन धुंकल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळले.
मंदिराच्या आवारात थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांना नोटिसा वैदिकांनी केली नाराजी व्यक्त
June 16, 2025
0
Tags
