वंचित नेते सुजात आंबेडकरांचा नाशिक मध्ये सरकारवर घणाघात
नाशिक दिनकर गायकवाड-राज्य सरकारला गोरगरीब आदिवासींचा विकास नको आहे म्हणूनच त्यांनी आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविला असल्याचा आरोप बंचित बहुजन आधाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला.
राज्य शासनाने आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविल्याच्या निषेधार्थ बंधित बहुजन आघाडी व एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने आदिवासी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व सुजात आंबेडकर यांनी केले. मोर्चासमोर बोलताना ते म्हणाले आदिवासींच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद घटनेमध्येच करण्यात आली आहे.
या विभागाचा निधी हा आदिवासींच्या हकाचा आहे, तो -कुणीही वळवू शकत नाही. लाडक्या बहिणींना अधिक पैसे द्या पण त्यासाठी आदिवासींचा निधी बळकु, नका,असे मत आंबेडकर यांनी
व्यक्त केले. यावेळी आदिवासी विकास आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी अनेकांची भाषणे झाली. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आदिवासी विकास आयुक्त लीना मेहेंदळे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले याबाबत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले. मोर्थात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
