नाशिक दिनकर गायकवाड भारतीय जनता पार्टी प्रणित महानगरपालिका जनता कामगार संपाच्या पाठपुराव्याला यश आले असून, मनपातील कंत्राटी वाहनमालकांना तीन महिन्यांचा थकित पगार त्वरित देण्याचे आश्वासन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले.
प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त चर्चेत कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले, नाशिक मनपातील ठेकेदार प्रणित कामगारांच्या विविध मागण्यांत आयुक्त कार्यालय येथे युनियनची बैठक झाली. यावेळी नाना शिलेदार, जीवन लासुरे, सरचिटणीस
गणेश कांबळे, विनायक जाधव पदाधिकारी यांनी मांडत मनपातील कंत्राटी वाहनचालकांना गेल्या तीन महिन्यांपासून मासिक वेतन मिळालेले नाही, हे स्पष्ट करण्यात आले वाहन चालकांचे थकित किमान वेतन देण्याचे मान्य केले. सर्व काम भविष्य निर्वाह निधी ठेकेदाराने मासिक वेतनासहित जमा करावेत, ठेकेदारावर प्रशासनाचा अंकुश ठेवावा समस्या लवकरात लवकर अतिरिक्त आयुक्त किंवा सक्षम अधिकारी व मनपाचे ठेकेदार मनपा जनता कामगार युनियनची संयुक्त बैठक लावावी, आदी मागण्या करण्यात आल्या
