श्रीरामपूर दिपक कदम तालुक्यात व शहरात गेली चोवीस तासापासून विज नाही महावितरणच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या भावना तिव्र झाल्या असून रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी महावितरण कार्यालय येथे निदर्शने करून महावितरणचे कार्यकारी अभियंता अजय भंगाळे यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्कयात आली. इथून पुढे विज गेल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यास कुठलीही पूर्व सूचना न देता तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी देऊन यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता अक्षय विखे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संजय छल्लारे मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जीवन सुरुडे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक सोहेल दारूवाला आम आदमी पार्टीचे तिलक डूगरवाल उपस्थित होते.
प्रसंगी महावितरणाच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेली दहा दिवसात दोन वेळेस २४ तास विज नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यात पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी तसेच वैद्यकीय सेवेत देखील अडथळा निर्माण झाला आहे लाईट कधी येईल हे तांत्रिक अधिकारी आणि वायरमन सांगत नाही अधिकारी फोन उचलत नाही त्यामुळे नागरिकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
म्हणून विज वेळापत्रकाची माहिती वेळोवेळी देण्यासाठी महावितरणने ती सुविधा त्वरित उपलब्ध करून लोकांना विज संदर्भात माहिती देण्यात यावी कारण सर्वसामान्य जनतेच्या भावना महावितरणाच्या विरोधात तीव्र झाल्या असून महावितरण कडून त्वरित सुधारणा व्हावी अशी जोरदार मागणी करण्यात आली.
त्यावेळी काँग्रेस पक्षाचे रियाज पठाण वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख बसपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे भाजपाचे मनोज भिसे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे राष्ट्रवादीचे आदित्य आदिक शिवसेनेचे संजय साळवे अविनाश पोहेकर शरीफ शेख नईम शेख अक्षय काळमेख अरबाज पठाण आदि उपस्थित होते
