वटपौर्णिमेनिमित्त तिसगाव ग्रामपंचायतीने केली वटवृक्ष लागवड

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड- वटपौर्णिमेचे औचित्य साधून देवळा तालुक्यातील तिसगाव येथे सरपंच सुलक्षणा राजेंद्र जाधव व ग्रामपंचायत अधिकारी अर्थना हेमंत सोनार आर्दीसह गावातील काही महिलांनी एकत्र येत गावात वटवृक्षांचे रोपण केले.
हा उपक्रम केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून,पर्यावरण संवर्धनासाठी एक छोटेसे पण आश्वासक पाऊल आहे.

वटपौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी खूप महत्वाचा मानला जातो.त्या दिवशी स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दिर्यायुष्याची प्रार्थना करतात,याचे झाडे म्हणजे दीर्घायुष्य, नित्यत्तत्व आणि निसर्गाशी नाते यांचे प्रतीक मानले जाते.

वडाचे झाड फक्त धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही फार मौल्यवान आहे. हे झाड भरपूर प्राणवायू (ऑक्सिजन) तयार करते, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवते आणि पक्षी व प्राणी यांना आश्रय देते. या झाडामुळे गावात थंडावा, हरित वातावरण तयार होते. हरित भविष्याची दिशा म्हणून वटवृक्षांची लागवड करताना प्रवणनि जाणवले, की आपण धार्मिकतेच्या जोडीने पर्यावरणाची जबाबदारीही

निभावली पाहिजे. जे झाड पूर्वी पूजले जायचे, ते आजही आपल्याला शुद्ध हवा आणि आरोग्य देते.त्यामुळे प्रत्येक वटपौर्णिमेला एक वडाचे झाड लावले, तर आपल्या पुढच्या पिढीला हरित, समृद्ध आणि निरोपी जीवन आपण देऊ शकतो.

या कार्यक्रमासाठी उपसरपंच दीपक आहेर, ग्रामपंचायत सदस्य अरविंद आहेर, उमाकांत आहेर, प्रवीण आहेर, दशरथ गायकवाड,स्वप्नाली देवरे, अर्चना आहेर,भीमाबाई ठाकरे, चद्रभागा पवार, पुष्पा पवार, तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, पोलीस पाटील उत्तम आहेर, अंगणवाडी सेविका सुनंदा वाघ, निर्मला आहेर, ग्रामपंचायत कर्मचारी शरद आहेर, भाऊसाहेब आहेर, नारायण वाघ, सचिन पवार यांनी सहकार्य केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!