नाशिक दिनकर गायकवाड- दर्शनासाठी आलेले भाविक स्नानासाठी रामकुंड येथे गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगांमधून ८ मोबाईल व ४० हजार रुपये चोरून नेल्याची घटना रामकुंड परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी शिवदयालसिंग मुलसिंग शेखावत (वय ६९, रा. जगदीशपुरी कॉलनी, जयपूर) हे काही भाविकांसमवेत रामकुंड परिसरात दर्शनासाठी आले होते.काल पहाटे ४ ते साडेचार वाजेच्या दरम्यान ते सर्व आपल्या बॅगा बसमध्ये ठेवून आंघोळीसाठी रामकुंड परिसरात गेले होते.
त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बसमध्ये प्रवेश करून ४० हजार रुपये रोख व ४५ हजार रुपये किंमतीचे ८ मोबाईल असा एकूण ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी शेखावत यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.