२० आरोग्य पथकाद्वारे आरोग्य विभागाकडून दोन द महिन्याच्या मोहिमेने अनाधिकृत केंद्र चालक धास्तावले
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील अनधिकृत गर्भपात व लिंग परीक्षणाला आळा घालण्यासाठी विविध गर्भपात केंद्रे तसेच सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी मोहीम हाती घेतली आहे.मोहिमेच्या पहिल्याच दिवशी विशेष पथकाने एकूण ३६ सोनोग्राफी केंद्रे आणि १२ गर्भपात केंद्रांवर तपासणी केली.
ही कारवाई कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक करण्यात आली असून नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या तपासणीसाठी वेगवेगळे २० पथक गठित केले असून तपासणी दरम्यान केंद्रांच्या परवाने, पीसीपीएनडीटी कायद्याचे पालन,रेकॉर्डमध्ये पारदर्शकता, तसेच सुसजता आणि योग्य कर्मचारी वर्गाची उपलब्धता याची तपासणी करण्यात येत आहे.
संपूर्ण शोध मोहीम २० पथकांमार्फत दोन
महिने चालणार आहे. या अंतर्गत कायद्याची प्रत लॅबच्या समोरच्या भागात लावण्यात आलेली आहे का, याची तपासणी करून गर्भपात किंवा सोनोग्राफी करताना रुग्णाची संमती घेतलेले फॉर्म भरण्यात आले आहे का, त्यांची संपूर्ण माहिती, पत्ता, कोणत्या डॉक्टरांनी त्यांना त्या ठिकाणी पाठवले याची संपूर्ण माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गोळा करण्यात येत आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने गर्भपात केंद्रांसाठी दोन प्रकारे मान्यता देण्यात येते. तपासणीचा पूर्ण अहवाल मोहीम झाल्यावर तयार करून आरोग्य अधिकाऱ्यांना सादर होणार आहे. यानंतर नियम भंग करणाऱ्यावर कारवाई होणार आहे. पथकात एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. शिवाय दोन स्त्री रोग तज्ज्ञ वेगवेगळ्या दवाखान्याच्या असल्या पाहिजेत. शहरात २४ आठवड्यांचे मान्यता देण्यात आलेले गर्भपात केंद्र ५२ तर १२ आठवड्यांचे मान्यता देण्यात आलेले गर्भपात केंद्र १२० आहे.
