प्रा.बाळासाहेब वाघमारे म्हणजे विद्यार्थ्यांचे संपूर्ण वैचारिक समाधान करणारे व्यक्तीमत्व- डॉ.संदेश शेळके

Cityline Media
0
- प्रा.बाळासाहेब वाघमारे म्हणजे शिस्तीसह प्रेरणेची तर्ककठोर वाट

झरेकाठी प्रतिनिधी शाळा शिक्षक समाजाचा एक अविभाज्य भाग आहे ते ज्ञानाचे प्रकाशस्तंभ आहेत जे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना सक्षम नागरिक बनवतात, शिक्षकांचे कार्य केवळ ज्ञान देणे नाही तर विद्यार्थ्यांना चांगले माणूस आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनण्यास मदत करतात या सर्व कसोटीस पात्र असलेले आणि  आमच्यासाठी एक दीपस्तंभ म्हणजे प्रा.ॲड.बाळासाहेब वाघमारे हे होय,अशी कृतज्ञता नुकतीच तेथे व्यक्त केली आहे डॉ.संदेश शेळके यांनी  त्यानिमित्ताने अनेक आठवणींना उजाळा मिळाला आहे.
प्रा. बाळासाहेब वाघमारे यांच्याबद्दल आणखी बोलताना डॉ शेळके म्हणाले की आमच्या वर्गात इतकी शांतता असे की, चुकून एखादी टाचणी जरी खाली पडली तरी तिचा आवाज ऐकू येईल.सरांचे वेळेवर वर्गात येणं, वेळेवर शिकवणं आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या बारीकसारीक चुकाही काटेकोरपणे निदर्शनास आणून देणं,विद्यार्थ्याचे संपूर्ण वैचारिक समाधान हेच त्यांच्या शिकवण्याच वैशिष्ट्य होतं. यामुळे सुरुवातीला अनेक विद्यार्थ्यांना ते नावडते शिक्षक वाटायचे. पण आज मागे वळून बघताना लक्षात येतं की, त्यांचा तो काटेकोरपणा,ती शिस्त,
तर्ककठोरपणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची नितांत काळजी, हाच तर त्यांचा खरे मोठेपणा होता आणि पिंडही

आज जेव्हा त्या मंतरलेल्या दिवसांची आठवण येते, तेव्हा जाणवतं की वाघमारे सर केवळ इंग्रजीचे शिक्षक नव्हते,तर ते आम्हाला जगाचे ज्ञान देणारे आमचे आज जीवन शिक्षक ठरले आहे.त्यांच्या प्रत्येक शब्दातून ते आमच्यात आत्म विश्वास जागवायचे. आणि खडकन् जागे करायचे इंग्रजी व्याकरणातील चुका दुरुस्त करताना ते नकळतपणे आमच्या विचार शक्तीला धार लावायचे.त्यांची वैचारिक पातळी अफलातून आहे,आज कधी, कधी ते समाज प्रबोधन करतात काही क्षणात जनता गोळा करून त्यांचे वैचारिक समाधान करण्याची किमया त्यांच्यात आहे त्यांनी आम्हाला केवळ इंग्रजी भाषाच शिकवली नाही,तर त्याहून महत्त्वाचं म्हणजे,त्यांनी आम्हाला योग्य बोलणं, योग्य वागणं सभा धारिष्ट आणि आत्मविश्वासाने उभं राहणं शिकवले आणि आळस न करता उदिष्ट प्राप्त करा हा त्याचा विचार आम्ही मनावर कोरुन ठेवला आहे आजही क्षणाक्षणाला तो विचार आठवला  ‌की रोजचा कामात चैतन्य वाढते
असेही यावेळी डॉ.शेळके म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!