प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की पुणे येथील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण समाजासमोर आल्यामुळे मराठा समाजातील विचारवंत जागृत झाले असून हुंडा घेणार नाही देणार नाही या संदर्भात जनजागृती करण्यासाठी नियमावली तयार केली आहे.
नियमावली मध्ये हुंडा घेऊ अगर देऊ नये कर्ज काढून लग्न करू नये लग्नाला १०० ते २०० लोकांना निमंत्रित करावे लग्नामध्ये डीजे न लावता पारंपारिक वाद्य लावण्यात यावे जेवणाचे मेनू पाचच प्रकारचे असावे, हळद साखरपुडा लग्न एकाच दिवशी करावे प्री वेडिंग फोटोशूट करू नये केल्यास त्याचा सगळ्यासमोर देखावा करू नये.
भेट वस्तू ऐवजी पुस्तके झाडे किंवा रोख रक्कम द्यावी हार घालताना नवरदेव नवरीला उचलून घेऊ नये नवरदेवासमोर दारू पिणाऱ्यांनी नाचू नये, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करू नये अशी समाज हिताची नियमावली तयार केली आहे तरी या अचारसंहिता नियमावलीचे प्रत्येक समाजातील घटकांनी पालन करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी या बैठकीला विविध पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान सुभाष त्रिभुवन गौतम उपाध्ये तेजस गायकवाड बाबासाहेब पवार यांनी केले आहे तसेच या कार्यक्रमासाठी समाजातील लग्न लावणाऱ्या सर्व धर्मगुरूंना देखील आमंत्रित केले आहे यावेळी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले
