आश्वी संजय गायकवाड लोकसेवक हा प्रशासन आणि सामाजिक कल्याणाच्या चौकटीत एक मूलभूत संकल्पना मूर्त रूप देतो.त्याच्या मुळाशी,सार्वजनिक सेवक म्हणजे अशी व्यक्ती ज्यावर सार्वजनिक हिताची सेवा करण्याची, सरकारचे प्रतिनिधित्व करण्याची आणि समुदायाचे कल्याण सुनिश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आश्वी खुर्द येथील तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण इल्हे यांची बदली त्वरित रद्द करा अन्यथा ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेत देण्यात आल्याने काहीसा गोंधळ उडाला आहे
आश्वी खुर्द ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा संरपच सौ.अलका बापुसाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली.यावेळी उपसरपंच बाबा भवर सदस्य संजय भोसले सोपान सोनवणे सागर भडकवाड प्रवरा बँकेचे संचालक बापुसाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड विलास गायकवाड राजेंद्र सोनवणे दगडु गायकवाड सौ.शोभना सोनवणे सह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
ऐनवेळीच्या विषयावर चर्चा सुरु झाली असता मा.ग्रापंचायत.सदस्य संतोष भडकवाड यांनी ग्रामपंचायत अधिकारी प्रविण इल्हे यांची बदली त्वरित रद करावी असा ठराव मांडला असता सर्व महिला व उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा दिला ग्रामपंचायत आश्वी खुर्द या गावांमध्ये ग्रामसेवक प्रवीण इल्हे यांनी पदभार स्विकारल्यानंतर गावात अनेक प्रश्न प्रलंबित होते, गावातील स्वच्छता,आरोग्य, विकास कामे, हे सगळे प्रश्न प्रलंबित होते, प्रवीण इल्हे यांनी पदभार स्विकारल्यानंतर गावातील स्वच्छतेच्या बाबतीतले सर्व प्रश्न मार्गी लावले.दलित वस्ती,जनसुविधा सर्व कामे योग्य रितीने मार्गी लागले. तसेच अनेक सर्व सामान्य जनतेचे कामे तात्काळ मार्गी लावत व प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणत व सर्वांशी मनमिळावू पणाने काम करून गावातील नागरिकांच्या मनावर चांगला ठसा उमटविला.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना घरकुल, रोजगार हमी योजने अंतर्गत गायगोठा तसेंच इतर सर्व योजना गरजू लाभार्थी पर्यंत पोचविण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. गावातील स्वछता विषयक कामे निव्वळ खुर्चीवर बसून आदेश न करता प्रत्यक्ष जाऊन व येणाऱ्या अडचणी दूर करून मार्गी लावले, महिला सक्ष्मीकरण,शाळा, अंगणवाडी डिजिटल करणे, सौर ऊर्जेचा वापर हेतूने सौर हायलॅम्प बसविले, दिव्यांग बांधवाना लाभ मिळून देणे,असे कित्येक कामे त्यांनी त्याच्या कार्यकाळात केलेले असल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत त्यांचे कौतुक करत गेले आणि खऱ्या अर्थाने त्यांनी नियमांच्या चौकटीत राहून लोकहित प्रवर्तकाची भूमिका निभावली त्यात त्याची झालेली बदली ग्रामस्थांच्या जिव्हारी लागली मग ग्रामस्थांनी ग्रामसभेत ग्रामसेवक इल्हे त्यांची बदली तात्काळ रद्द करावी अशा मागणीचा आग्रह धरल्याने सरपंच सौ.अलका बापूसाहेब गायकवाड व उपसरपंच.बाबासाहेब भवर यांनीही गटविकास आधिकारी यांना पत्र देऊन बदली रद्द करण्याची मागणी केलेली आहे.
बदली रद्द न झाल्यास ग्रामपंचायतला टाळे ठोकून पालकमंत्र्यांना निवेदन देणार
-आम्ही सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामविकस अधिकारी प्रवीण इल्हे यांनी पदाधिकारी, ग्रामस्थ व शासन यांच्यातील दुवा होत विकास कामे व दैनंदिन कामकाज अतिशय योग्य पणे मार्गी लावलेले आहे. त्यामुळे त्यांची अचानक झालेली बदली मुळे नागरिक व पदाधिकारी यांच्यात तीव्र संताप झालेला असल्याने तात्काळ बदली आदेश रद्द करावा अन्यथा ग्रामपंचायत .कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देत लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे
सौ.अलका बापूसाहेब गायकवाड -प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच
