नाशिक दिनकर गायकवाड शहरातील पोलीस ठाण्यांच्या ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश नुकतेच पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी काढले आहेत.
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांची बदली पंचवटी पोलीस ठाण्यातून अंबड पोलीस ठाण्यात झाली आहे.भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांची भद्रकालीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात, राकेश चौधरी यांची अंबडहून भद्रकाली
पोलीस ठाण्यात, जितेंद्र सपकाळे यांची उपनगरहून नाशिकरोडला, अशोक गिरी यांची नाशिकरोडहून सरकारवाडा (दुय्यम), जयंत शिरसाठ यांची देवळाली कॅम्पहून उपनगरला, त्यांच्या जागी भद्रकाली पोलीस ठाण्याचे श्रीनिवास देशमुख, मनोहर कारंडे चुंचाळे चौकी
ते अंबड (दुय्यम), विश्वास पाटील यांची सातपूरहून चुंचाळे चौकीत, संजय पिसे यांची नियंत्रण कक्षातून आडगाव पोलीस ठाण्यात, आडगावचे वरिष्ठ पोलीस सचिन खैरनार यांची आडगावहून अंबड (दुय्यम), तर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांना अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले आहे.
