नाशिक दिनकर गायकवाड- महानगर पालिकेच्या नाशिक पूर्व विभागातील द्वारका सर्कल ते बोधले नगर रोड,विजय ममता सिग्नल नाशिक पुणे रोड आदी रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले अनधिकृत बॅनर्स व बांधकामांवर गाळ्या समोरील शेडवर धडक कारवाई करीत मनपाच्या अतिक्रमण विभागाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केले.
नाशिक मनपा हद्दीत नाशिक पूर्व विभागात अतिक्रमण विभागाकडून काल द्वारका भागातील अतिक्रमण निर्मुलन पथकाने कारवाई केली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दैनदिन पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मनपा आयुक्त तथा
प्रशासक डॉ.मनिषा खत्री यांच्या मान्यतेने अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार उपआयुक्त (अति) सुवर्णा दखणे तसेच नाशिक पूर्व व सातपूर विभागामार्फत विभागीय अधिकारी राजाराम जाधव, पंचवटी विभागीय अधिकारी, मदन हरिश्चंद्र,नविन
नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी व नाशिकरोड व नाशिक पश्चिम विभाग विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.या कारवाईत प्र.सहाय्यक अधिक्षक संजय चौधरी व सहाही विभागातील लिपिक, गाडी प्रमुख व
अतिक्रमण पथकातील कर्मचारी उपस्थित होते.नाशिक पूर्व विभागातील द्वारका सर्कल पासून ते बोधले नगर रोड, विजय ममता सिग्नल नाशिक पुणा रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूने -अनधिकृत बॅनर्स व बांधकामांवर गाळ्या समोरील शेड या परिसरात रस्त्यालगत अनधिकृत
व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोहीम राबवून ५५ व्यावसायिकांवर कारवाई करून वाहतूक मार्ग, पथमार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांनी ज्या कोणी अतिक्रमण केले असेल त्यांनी ते स्वतः हून काढून घ्यावे, अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल, तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल,असा इशारा स्मिता झगडे यांनी दिला आहे. -
