निफाड प्रतिनिधी तालुक्यातील आणि येवला मतदारसंघातील कानळद येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रामध्ये ५ एम.व्ही.ए. रोहित्राची क्षमता १० एम.व्ही. ए करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सुमारे १ कोटी ४३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज या कामाचे भूमीपूजन समारंभ कानळद येथे भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून भूमिपूजन पार पडले. परिसरातील शेतकरी बांधवांना या कामामुळे विजेची उपलब्धता मुबलक प्रमाणात होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत ग्रामीण भागातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण नेहमी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली
यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडी, महावितरणचे कार्यकारी अभियंता व्ही. के. काळुमाळी, उपकार्यकारी अभियंता फुंडे, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, संचालक डॉ. श्रीकांत आवारे,भाऊसाहेब बोचरे, शिवाजी सुपनर,
विनोद जोशी,बाळासाहेब पुंड, दत्तात्रय घोटेकर, गोरख शिंदे, सुरेखा नागरे,अरुण घुगे, तुकाराम गांगुर्डे, अशोक नागरे, पांडुरंग राऊत, विलास गोरे, बालेश जाधव, योगेश साबळे, बबन शिंदे, माधव जगताप, शिवाजी जाधव, प्रकाश घोटेकर, राहुल आहेर, कृष्णराव पारखे, भाऊसाहेब पारखे, मिलिंद पगारे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
