शब्दगंधचे उपक्रम नवोदितांसाठी प्रेरणादायी-ॲड.सुनिल कात्रे

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी मानव विकास यामध्ये साहित्याचे मोठे योगदान असून काव्य लेखन हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे,मराठी भाषेच्या समृद्धीसाठी  शब्दगंधच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून नवीन लिहिणाऱ्या कवींसाठी आजचे जलधारा काव्यसंमेलन निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे* असे मत ज्येष्ठ प्रा.ॲड.सुनील कात्रे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय जलधारा काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर ज्ञानदेव पांडुळे,बापूसाहेब भोसले, प्राचार्य जी.पी.ढाकणे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, प्रा. डॉ.अशोक कानडे, भगवान राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.ॲड. सुनील कात्रे म्हणाले की, शब्दगंधच्या वतीने सातत्यपूर्ण साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करून अनेकांना संधी देण्याचा प्रयत्न होत आहे, ही कौतुकास्पद बाब असून नव्याने लिहिणाऱ्यांनी शब्दगंधचे सभासदत्व स्विकारायला हवे. 
यावेळी झालेल्या काव्य संमेलनात रामदास कोतकर, डॉ. विनय पिंपरकर, प्रमिला वाघ, रूपचंद शिदोरे, महादेव लांडगे, विश्वेश्वर बोडके, सुरेखा घोलप, बबनराव गिरी, सुमेध ब्राह्मणे, राजेंद्र फंड, वर्षा भोईटे, रुक्मिणी नन्नवरे, दुर्गा कवडे, प्रबोधिनी पठाडे, प्रशांत सूर्यवंशी, शरद धलपे, समृद्धी सुर्वे, राहुल शिंदे, जयश्री सोनार, ज्ञानदेव पांडुळे, शाहीर भारत गाडेकर, शर्मिला गोसावी यांनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या. 
  यावेळी  मुख्याध्यापकपदी नेमणूक झाल्याबद्दल श्रीमती वर्षा भोईटे, पर्यवेक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल भारत गाडेकर, असोसिएट प्रोफेसर झाल्याबद्दल प्रा. डॉ. अशोक कानडे, नवीन सभासद म्हणून रूपचंद शिदोरे, सेवानिवृत्ती बद्दल डॉ.अशोक दौंड,राजेंद्र फंड व कॉस्च्युम डिझायनर म्हणून भाग्यश्री राऊत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

पत्रलेखन स्पर्धेतील विजेते क्रांती वाघ, विबोध मस्के, दिपाली राजापुरे, नंदिनी मुंठे, आयुष गोसावी, सानिध्या भडके, सन्मित्र कटारिया, शाईन शेख यांना स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र व पुस्तके भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी गणेश भगत,जयश्री राऊत, शर्मिला रणधीर, मारुती खडके, गोरक्षनाथ फंड, मकरंद घोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले तर अंतिमतः प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी आभार मानले.

जलधारा काव्यसंमेलनास शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, आष्टी सह अहिल्यानगर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी शब्दगंधचे मार्गदर्शक प्रा.डॉ.शंकर चव्हाण, ज्येष्ठ लेखक मारुती चितमपल्ली व प्रा. डॉ. वसंत  जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा गोसावी,भाग्यश्री राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!