आज हुंड्यासारख्या विषयावर भाषण करावे लागते हे दुर्दैवी आहे-शरद पवार
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथील बालगंधर्व रंगमंदिरात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित यशस्विनी सन्मान सोहळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित नुकताच पार पडला.
याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ. श्यामल गरुड यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', गडचिरोली येथील मनिषा सजन पवार यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', रायगड येथील उल्का महाजन यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान', मुंबई येथील अलका धुपकर यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान', धाराशिव येथील कमल कुंभार यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान' तर अहिल्यानगर येथील डाॅ. शबनम शेख यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान' या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व उपस्थितांशी संवाद साधला.
महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो.पण संपुर्ण ३६५ दिवस माणुसकीचा दिवस साजरा करणे गरजेचे आहे. २२ जुन १९९४ साली महिला धोरणाची अंमलबजावणी झाली, त्यामुळे महिला उंबरठा ओलांडून बाहेर आल्या. मी २००९ पासून बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या आशिर्वादामुळे खासदार म्हणून काम करत आहेत. तंत्रज्ञान बदलत असते.शरद पवारांनी महिला धोरण आणले त्यावेळी सायबर क्राईम हा मुद्दा नव्हता. पण आता महिलां विरोधात सायबर क्राईम वाढला आहे, त्यामुळे महिला धोरणात सायबर क्राईमचा समावेश करणे गरजेचे आहे, असे मत मांडले.
एकीकडे आपण असे नवीन तंत्रज्ञानाला अनूसरून बदल करत असताना, या पुण्यात हुंडाबळी सारखा घटना घडणे दुर्देवी असल्याचे मत त्यांनी मांडले.
आज हुंड्यावर भाषण करावे लागत आहे,हे खूप वेदनादायी आहे. हे समाज म्हणून आपले अपयश आहे.सुशिक्षित कुटुंबात देखील हुंड्यासारख्या घटना घडत आहे, हे धक्कादायक असल्याचे मत मांडले.आपण मुलींना नाही म्हणायला शिकवले आहे.आपण कुठे कमी पडलो, याचे आत्मचिंतन करायची गरज आहे. नुकताच अमेरिकेचा एक रिपोर्ट आला आहे की,अमेरिकन महिलांनी विचार करुन भारतात जावे असे सांगण्यात आले आहे, कारण भारत महिलांसाठी सुरक्षित नाही.हे आपल्यासाठी नक्कीच भुषणावह नाही. एक समाज म्हणून आपण आजच्या या परिस्थितीचे गुन्हेगार आहोत. राजकारण होत राहिल, विकास होत राहिल पण हुंडाबळी होत असतील तर त्याला काय अर्थ राहिल,अशा शब्दात खेद व्यक्त केला. त्यामुळे आपण पुढच्या वर्षी जेंव्हा एकत्र येऊ त्यावेळी आपण हुंडाबंदी आणि महिला सुरक्षितता यावर काय काम केले, याचा आढावा आपण घेतला पाहिजे.त्यामुळे जुलै महिन्यापासून संपुर्ण महाराष्ट्रात जास्तीतजास्त जन संघटन तयार करून हुंडाविरोधी मोहिम राबवायची आहे.यासाठी संस्था, काॅलेज यांची देखील मदत मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी हुंडा घेणाऱ्याच्या लग्नाला जाण्याचे देखील टाळले पाहिजे,असे आवाहन केले.
यावेळी लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक परिवर्तन झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला त्यामुळे सरकारने महिलांना स्वत:च्या पायावर उभे कसे करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवर्जुन सांगितले.
यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी वडिलांची हत्या होऊनही आसावरी जगदाळे हिने दाखवलेल्या धैर्याचे काैतुक केले. यावेळी तिला तिच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
संगीत देवबाभळी नाटकातून प्राजक्त देशमुख यांनी दिलेला संदेश खुप महत्वाचा असल्याचे सांगितले.आजही महाराष्ट्रात संवेदनशील पुरूष आहेत , हे पाहून समाधान वाटते. यावेळी भाषा सक्तीच्या धोरणाला विरोध केला.यावेळी देशातील पहिल्या एआय लॅब बारामतीत होत असल्याचे अभिमानाने सांगितले. महिलांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर विचार करण्याची गोष्ट आहे,असे आवर्जुन सांगितले.
याप्रसंगी लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख,आसावरी जगदाळे, निर्मला सामंत प्रभावळकर, रोहिणी खडसे, यशवंतराव चव्हाण सेंटरचे पुणे सचिव अंकुश अण्णा काकडे, प्रशांत जगताप, चव्हाण सेंटरचे पदाधिकारी यांच्यासह महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
