नारायणगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क कृषी विज्ञान केंद्र,नारायणगाव येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा पार पडला. "विकसित कृषी संकल्प अभियान" नारायणगाव शहरातील टोमॅटो मार्केट ते कृषी विज्ञान केंद्र पदयात्राही आयोजित करण्यात आली.
यावेळी शिवराजसिंह चौहान यांना नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातून सुरू असलेल्या कामांची, विविध प्रकल्पांची माहिती दिली. तसेच, शेतकऱ्यांना बिबट्यांचे हल्ले, अतिवृष्टी, बाजारभाव यांसारख्या अनेक संकटांचा सामना करावा लागत असून आमच्या या शेतकरी बांधवांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत अशी मागणी केली.
यावेळी राज्याचे कृषिमंत्री.माणिकराव कोकाटे, खासदार अमोल कोल्हे नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिभूषण अनिल मेहेर, आमदार. शरद सोनवणे, मा आ.अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, प्रदीप कंद, .आशा बुचके यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
