मुंबई सिटीलाईन नेटवर्क राज्याचे महामहिम ही.पी. राधाकृष्णन राज्यपाल यांच्या समवेत महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली
असून ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि आश्वासक ठरली.
राज्यपालांनी आधी मिळालेला मोजका वेळ मात्र नंतर राज्यातील महत्त्वाच्या विषयांवरची चर्चा पाहता राधाकृष्णन यांनी तब्बल ५५ मिनिटांचा वेळ या भेटीसाठी देणे हे प्रचंड समाधानकारक आहे. या बैठकीमध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा झाली.
१) वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये पोलीस आणि राजकीय वरदहस्त याचा विचार करता हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात यावे तसेच या प्रकरणातील चर्चेत आलेली व्यक्ती म्हणजेच पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर तथा त्यांचे सख्खे मेहुणे व खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचा या प्रकरणातील अतिरिक्त हस्तक्षेप टाळावा तसेच शशिकांत चव्हाण व जालिंदर सुपेकर यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी.
२) लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने आर्थिक तरतूद निश्चित करावी मात्र यासाठी सामाजिक न्याय विभाग किंवा आदिवासी कल्याण विभागाचा निधी वळता करू नये.पार्टी महाज्योती सारथी या विभागातील संशोधक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळायला हवी.
३) पुणे जिल्ह्यातील विशेषतः लोहगाव विमाननगर विश्रांतवाडी धानोरी या परिसरातील अनाधिकृत पगार यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी पुणे आयुक्तांना सूचना निर्गमित कराव्यात तथा ड्रग्स विरोधी मोहीम अधिक तीव्र व्हावी.
४) राज्यातील बेपत्ता महिला आणि मुलींची वाढती संख्या लक्षात घेता या बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींच्या शोध मोहिमेसाठी विशेष कक्ष कार्यान्वित व्हावा.
५) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायद्याचा परिघ अज्ञात असणारी व्यक्ती असावी. आयोगाची रिक्त असणारी सदस्य पदे तात्काळ भरली जावीत. विभागीय कार्यालय सुरू व्हावीत. आयोगाचा राजकीय पक्षपाती दृष्टिकोन टाळण्यासाठी ओ राजकीय व्यक्तीची नेमणूक व्हावी.
या शिष्टमंडळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, जयश्री शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या रोहिणी खडसे विद्या चव्हाण काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड आदी सहभागी होत्या.
प्रदीर्घ चाललेल्या या बैठकीमध्ये राज्यपाल यांच्याकडून सनदी अधिकारी प्रशांत नारनवरेची यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची होती ती अधोरेखित करण्यात आली यावेळी राजभवन मधील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
