राज्यातील पहिल्या नंदी आश्रम शाळेचे हिवरगाव पावसा येथे लोकार्पण.

Cityline Media
0
राजर्षी महंत एकनाथ महाराज आयोध्या धाम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना छत्री वाटप 

संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे ओजस्वी भारत फाउंडेशनच्या मार्फत महाराष्ट्रातील पहिल्या नंदी शाळेचे उद्घाटन नुकतेच पार पडले.यावेळी ओजस्वी भारत फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजर्षी महंत एकनाथ महाराज आयोध्या धाम  यांच्या हस्ते नंदी आश्रम शाळेचे उद्घाटन करताना अनेक मान्यवर उपस्थित होते.
.                 छाया-बच्चन भालेराव 
श्री.श्री १००८ श्री.तपस्वी छावनी पीठाधीश्रर जगदगुरू परमहंस आचार्य यांचे उत्तरअधिकारी तथा ओजस्वी भारत फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष
राजर्षी महंत एकनाथ महाराज
कृपा पात्र शिक्ष अयोध्या धाम यांच्या हस्ते येथील विद्यार्थ्यांना छत्रीचे व खाऊचे वाटप करण्यात आले.

हिवरगाव पावसा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप करता प्रसंगी बोलताना राजर्षी महंत एकनाथ महाराज म्हणाले,आज आपला देश महासत्तेच्या दिशेने प्रगती करत आहे,हे केवळ भारतीय राज्यघटनेमुळे शक्य झाले आहे. गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर नोकरी करत आहे,त्यांना मान सन्मान मिळत आहे.हे केवळ राज्यघटनेमुळे शक्य झाले आहे.भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जातात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा भगवान गौतम बुद्धांच्या आध्यात्मिक विचारांपुढे नतमस्तक झाले.अध्यात्माच्या पुढे ज्ञान नतमस्तक होते.म्हणून विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक असावे मात्र अंधश्रद्धा बाळगु नये.उच्च शिक्षण घेऊन गावाचे व देशाचे नाव मोठे करावे असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना दिला.
                  छाया-बच्चन भालेराव 
त्यानंतर ओजस्वी भारत फाउंडेशनच्या मार्फत नंदी आश्रम शाळेचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष राजर्षी महंत एकनाथ महाराज म्हणाले की भारतभर सर्वत्र गोशाळा आहे परंतु नंदी शाळा कोठे नाही, नंदीचे महत्त्व समाजाला अजूनही समजले नाही,नंदी म्हणजे धर्माचे प्रतीक आहे.नंदी म्हणजे धर्म आहे.नंदी शिव भगवान यांचे वाहन आहे.कैलासाचा द्वारपाल नंदी आहे. कसायाच्या हातून नंदी वाचवण्यासाठी हिवरगाव पावसा येथे नंदी आश्रम शाळा सुरू केली आहे.ओजस्वी भारत फाउंडेशनच्या मार्फत भारतभर नंदी आश्रम शाळा उघडणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. किर्तनकार आपल्या किर्तनातून गाई विषयी मार्गदर्शन करत आहे तसेच त्यांनी नंदी विषयी मार्गदर्शन करावे.देशी नंदी संवर्धनाला सुरुवात झाली आहे, या विचाराचा देशभर प्रचार आणि प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे,असे उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले.तसेच सध्याच्या काळात ही संख्या अनेक पट कमी झाली आहे.देशी गोवंश संख्यात्मक ऱ्हास होत आहे.हा चिंतनाचा विषय आहे.तसेच देशी नंदीचे संवर्धन करण्या करता देशी प्रजातीचे नंदी या शाळेत दाखल करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

 हिवरगाव पावसा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप कार्यक्रम मोठा उत्साहात संपन्न झाला.तसेच नंदी आश्रम शाळेच्या उद्घाटन प्रसंगी ओजस्वी भारत फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदिप सरवार,राजस्थान प्रदेशाध्यक्ष

सुरेश कुमार सिंग,राष्ट्रीय जनरल सचिव मधुकर रहाणे,राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा  प्रमिला बांगर,अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष उत्तम नाना जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विकास हासे, संगमनेर तालुकाध्यक्ष महेश पावसे,संगमनेर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष 

काशिनाथ पावसे, भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,सरपंच सुभाष गडाख, वृक्षमित्र गणपत पावसे,शिवसेना मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव,डॉ.रमेश पावसे,देवगड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उगले,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश नगरे,कैलास दिवटे, सोमनाथ दवंगे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

तसेच देवगड विद्यालय,जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थी,राजर्षी महंत एकनाथ महाराज यांचे वर्गमित्र,बालपणीचे मित्र,पालक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
                     छाया-बच्चन भालेराव 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!