खळी येथील आरोग्य उपकेंद्रात योगा दिन विविध असनांनी साजरा

Cityline Media
0
दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये विविध असनांनी साजरा करण्यात आला.
यावेळी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेविका सौदामिनी म्हकाळे यांनी उपस्थित नागरिकांना योगाचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की मानवी जीवनामध्ये आपल्या शरीरातील आजार कमी करायचे असेल तर दररोज दैनंदिन सकाळी उठल्यानंतर योगा करणे अत्यंत गरजेचे आहे.

योगा केल्याने आपल्या शरीरातील असणाऱ्या सर्व रक्तवाहिन्या मोकळ्या होतात त्यामुळे श्वास घेण्यासाठी मदत होते व दैनंदिन जीवनामध्ये मानवी शरीर योगासन केल्याने आनंदी राहते त्यातून शारीरीक व्याधी दूर होण्यास मदत होते दिवसभर माणूस कामकाजामध्ये उत्साही राहते.

 त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण देता येईल ते नेहमी हसतमुख आणि चोवीस तासाच्या १५ ते २० तास कामकाजामध्ये उत्साही व आनंदी असतात त्यामुळे आजच्या युगामध्ये 

लहान मुलासह मोठ्या माणसाने आपल्या शरीरातील आजार पळवायचे असतील तर दैनंदिन जीवनामध्ये दररोज सकाळी योगा करणे अत्यंत गरजेचे असल्याचे गौरवोद्गार खळी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका सौदामिनी म्हाकाळे यांनी केले.
 या योगासनासाठी आश्वी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश काकड यांनी विशेष मार्गदर्शन केले आहे याकरिता सदर योगासनासाठी खळी येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर वाघमारे पत्रकार रवींद्र दुशिंग आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!