श्रीरामपूर दिपक कदम राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सर्रास गोहत्या होते आताही होणार आहे अशी गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाल्याने लोणी पोलीस ठाणे हद्दीतील ममदापूर येथे पोलिसांनी अनेक सुटका केली तर लाखो किमतीचे गोमांस जप्त केले त्यात अनेक साहित्य शस्त्रे वाहने पोलिसांनी जप्त केले.
येथील शोयब यासीन शेख याचे राहते घराचे पाठी मागील बाजुस हिरव्या रंगाचे पत्र्याचे शेडमध्ये लोणी पोलीस ठाण्याच्या पथकाने यांनी छापा टाकला असता आरोपी १) शोयेब यासीन कुरेशी वय-२८ वर्षे २)अब्दुल रहेमान यासीन शेख वय ३० वर्षे ३)अब्दुल करीम कुरेशी,
४) मुनीर आमीर कुरेशी,५) शाकीब रज्जाक कुरेशी, ६) साजीद युनीस कुरेशी, ७) बकर उर्फ गोट्या राजु शेख सर्वजण गोवंशीय जनावरांची कत्तल करताना तसेच कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांना मोकळ्या जागेत विना अन्न पाण्याचे बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आले.
यामध्ये १,४०,०००/-रुपये किंमतीचे ७०० किलो वजनाचे गोवंशीय जातीचे कत्तल केलेले गोमांस, ३०,०००/- रुपये किंमतीची पांढरे रंगाची एक गावरान गाय ,९०,०००/- रुपये किंमतीच्या ३ गोवंशीय जातीचे काळ्या पांढ-या रंगाचे जर्सी गायी ,दोन चाकु व कोयता
असा एकूण २,६०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई ही पोलिस हवालदार कल्याण मधुकर काळे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आली असून यामध्ये या सर्वजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक. सोमनाथ घार्ग, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,. शिरीष वमने, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह लोणी पोलिसांनी केली केली आहे.
