नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क- मैत्रीच्या नात्यातील विश्वासघात आणि प्रेमाच्या त्रिकोणातून नागपूरमध्ये हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. एका मित्राने गर्लफ्रेंडसोबत का? राहातो, म्हणून आपल्याच मित्राची दगडाने ठेचून हत्या केली. नागपूरच्या अग्रसेन चौकात घडलेल्या या धक्कादायक घटनेने नागपूरमध्ये खळबळ उडाली.
शैलेश हिरालाल असे मृत तरूणाचे नाव, तर आरोपीचे नाव अनुराग बोरकर असे आहे. अनुराग बोरकरने आपला मित्र शैलेश हिरालाल याच्या डोक्यावर आणि छातीवर दगडाने प्रहार करून त्याला रक्तबंबाळ केले. दोघांची मैत्री नागपुरात पाच वर्षे टिकली, पण अनुरागच्या प्रियसी सोनू मरस कोल्हे हिच्या शैलेश सोबतच्या नात्याने अनुरागच्या मनात रागाची विणगी पेटवली. या रागातून अनुरागने शैलेशचा जीव घेतला. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी शैलेशला रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी अनुरागला ताब्यात घेऊन तपास गुरू केला आहे.
बाजारात एका मित्राने आपल्याच मित्राच्या डोक्यावर दगडाने पहार करून खून केल्याची घटना समोर आली.अनुराग बोरकर आणि शैलेश हिरालालची होशंगाबादची कारागृहात दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये मैत्री होती.
मागील ५ ते ६ वर्षा पासून हे दोघेही नागपुरात राहत होते. सोनू मरसकोल्हे ही अनुराग सोबत लिव्हइनमध्ये राहात होती. मात्र काही दिवसांपासून तीय शैलेशसोबत राहत असल्याने अनुरागच्या मनात राग होता. त्यामुळे दुरावा वाढला होता, रात्री अग्रसेन चौकात शैलेश आणि अनुराग हे समोरासमोर आले.
तेव्हा मनातील राग बाहेर काढत अनुरागने एक दगड शैलेशच्या छातीत आणि डोक्यावर मारून त्याला रक्तबंबाळ केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेत शैलेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शैलेशला मृत घोषित केले. पोलिसांनी हत्येचा तपास करत आरोपी अनुराग बोरकरला जेरबंद केले. पुढील तपास सुरू केला आहे.
