नाशिक दिनकर गायकवाड-
प्रेमसंबंधातून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने वारंवार होणाऱ्या मानसिक त्रास कंटाळून एका विवाहितेस आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे वृत्तपत्र विक्रेते असून, ते जेलरोड परिसरात राहतात. या प्रकरणातील आरोपी प्रकाश माधव उधाडे (वय ४०, रा. बेला डिसुझा रोड, जेलरोड, नाशिक) याने फिर्यादीच्या पत्नीस "तू माझ्याशी लग्र कर. नाही तर मी आपल्या
दोघांच्या प्रेम संबंधा बाबत व माझ्या मोबाईल मधील आपल्या दोघांचे फोटो तुझ्या पतीला दाखवेन व सांगेन," अशी धमकी दाखवून मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून महिलेने विषारी औषध सेवन केल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस विवाहितेला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश
उघाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस
निरीक्षक बर्वे करीत आहेत.
