नाशिक दिनकर गायकवाड- घरी असलेल्या महिलाच्या मोबाईलवर फोन करुन एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला तस्लिम रनालावाला (वय ४६, रा. टाकळी रोड, द्वारका, नाशिक) या खासगी नोकरी करतात. दि. ८ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रनालायाला या घरी होत्या. त्यावेळी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कोणी तरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवादे करीत आहेत.
