मुंबई मंत्रालय प्रतिनिधी राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख व आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशिक्षण मिळावे,यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन,इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ केंद्र उभारण्यात यावे,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील आढावा बैठकीत दिले.
‘सीट्रीपलआयटी’ केंद्र उभारण्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यात यावी तसेच यासाठी आवश्यक असणारा १५ टक्के निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ.राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा,उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासू, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी लहू माळी, ‘एम.आय.डी.सी.’चे अधिक्षक अभियंता कैलास भांडेवार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालक माधवी सरदेशमुख, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, सहसचिव मनोज जाधव, सहसचिव योगेश पाटील, प्रकल्प समन्वयक प्रितम गंजेवार उपस्थित होते.