नाशिक प्नतिनिधी नुकतीच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिक महानगरपालिका अंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठक पार पडली.असुन महापालिकेतील शाळांची गुणवत्ता,आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,शिक्षकांची पदभरती, डिजिटल शिक्षणाची अंमलबजावणी, पोषण आहार तसेच विविध योजनांची सद्यस्थिती यांचा सविस्तर आढावा घेतला.
राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यात ज्या विद्यार्थ्यांना काही आजार आढळून आल्यास त्याच्यावर उपचार केले जातील. आरोग्य तपासणी दरम्यान काही विद्यार्थ्यांचे काही आजार आढळून आल्याने पुढील उपचार देखील करण्यात आले.
नाशिक महापालिकेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या पाहिजे इतके दर्जेदार शिक्षण देण्यात यावे. पटसंख्या वाढीसाठी प्रयत्नशील राहून शाळा अधिकारी व लोकप्रतिंधींना पालकत्व देण्यात यावे. येणाऱ्या काळात हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाढविण्यात येईल.
यावेळी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांमध्ये आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, शिक्षकांचे रिक्त पद तत्काळ भरावेत, डिजिटल शिक्षणाचा प्रभावी वापर व्हावा या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. नाशिकमधील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या बैठकीप्रसंगी संबंधित विभागांचे अधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
