नाशिक दिनकर गायकवाड येवला येथे वडाच्या झाडाला सात फेन्या घालून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे,अशी कामना करीत येवला शहर व तालुक्यातील महिलांनी वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी केली.
शहरातील विविध भागांत महिलांनी वडाची पूजा केली. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवल्यात अनेक महिला पैठणी नेसून दागिने घालून - महिलांनी पारंपरिक वेशभूषेत,नटूनथटून त्यांनी वडाच्या झाडांचे पूजन केले.
सकाळ पासूनच महिलांची वटपूजनासाठी मोठी गर्दी झाली होती.
वटपूजनाचा मुहूर्त सकाळी साडे अकरानंतर असल्याने दुपारी - चार वाजेनंतर पुन्हा महिलांनी वटपूजा करून शुभेच्छा दिल्या, तसेच सत्यवान सावित्रीची कथाही अनेक महिलांनी ऐकली.सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आलेल्या यमराजाच्या पाठीमागे सावित्रीही जाते.
तीन दिवस प्रार्थना करते व यमराजाकडून अखंड सौभाग्यवती राहा, असा आशीर्वाद मिळवीत पतीचे प्राणही परत मिळविते, ही कथा ऐकत महिलांनी प्रार्थना केली. वडाला प्रदक्षिणा घालताना सूत बांधण्यात आले. आंबा, गहू-तांदूळ यांनी ओटी भरली.
शहरातील फतेबुरुज नाका, शहर पोलीस ठाणे, साठ फुटी रोड, रोकडे हनुमान मंदिर, मोरे वस्ती, पालखेड कॉलनी, दत्तमंदिर, जुने कोर्ट, पुळगाव शनी फाटा या परिसरांतील डेरेदार वटवृक्षांची पूजा करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याने या परिसरालाही जणू एखाद्या उत्सवाचे रूप आले होते.
