नाशिक दिनकर गायकवाड वैजापूर तालुक्यातील चिंचहगाव शिवारात असलेल्या आश्रमात काल रात्री महिला किर्तनकारची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. महाराज ह.भ.प.संगीता पवार असे हत्या झालेल्या किर्तनकाराचे नाव आहे.
घडलेल्या या घटनेने एकच खळखळ उडाली आहे.महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या होणे, ही गंभीर बाब आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे. संगीता पवार यांची हत्या
का केली? या गुन्ह्यामागे कोण आहे? याबाबत
पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. संगीता महाराज यांची हत्या झाल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आश्रमातील कर्मचारी आणि इतरांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. श्वानपथकाकडून पुरावे शोधण्याचे काम करण्यात येत आहे.