नाशिक दिनकर गायकवाड हदपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात फिरणाऱ्या तडीपार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार तौसिफ सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी मुजफ्फर मोईनुद्दीन शेख (वय ४२, रा. भोई गल्ली, कथडा, जुने नाशिक) याला नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. असे असताना शेख हा हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून दूध बाजारातील महात्मा फुले मार्केटच्या समोर विना परवानगी फिरताना आढळून आला.