पुणे महापालिका निवडणुकांसाठी भाजपचे आधारभूत सर्वेक्षण

Cityline Media
0
चाळीस माजी नगरसेवकांसह प्रस्थापितांना बसणार धक्का
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तीन सर्वे करण्यात येणार आहेत.त्यातील पहिला सर्व्हे आता समोर आला आहे. या सर्व्हेतून अनेक प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचे समजते.
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावरच निवडणूक लढवावी अशी भूमिका वरिष्ठांपासून स्थानिक नेत्यांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.स्वबळावर

निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तरी भाजपकडे प्रत्येक प्रभागामध्ये चार जागांसाठी तब्बल १६ ते २० इच्छुक उमेदवार असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा दिसत आहे. त्यामुळे भाजपने इच्छुकांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी केली आहे. यामध्ये माजी नगरसेवकांना पहिल्या गटांमध्ये ठेवण्यात आला आहे.

मात्र भाजपकडून करण्यात आलेल्या पहिल्या सर्व्हेमध्ये २०१७ मध्ये निवडून आलेल्या ४० माजी नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगितले जात आहे. पुणे महापालिकेमध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकीनंतर तब्बल १०० नगरसेवक भाजपचे होते. जवळपास सगळेच यंदा देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपच्या पहिल्या सव्हें मध्ये वातील ४० जणांसाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

पहिल्या सर्व्हेमध्ये काही माजी नगरसेवकांची लोकप्रियता घटली असल्याचे दिसत आहे.त्यामुळे यंदाची महापालिकेसाठीची उमेदवारी केवळ सर्वेक्षणाच्या निकषांवर दिली जाणार आहे. त्यामुळे लोकप्रियता गमावलेले, जनतेशी संपर्क नसलेले बिंया कार्यक्षमतेल मागे पडलेले माजी नगरसेवक बाजूला ठेवले जाणार आहेत.पक्षाला पुन्हा एकदा पुणे महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवायची असून त्यासाठी जिंकू शकतील अशा उमेदवारांनाथ तिकीट दिले जाणार आहे. हे सर्व्हेक्षण तीन

पातळ्यांवर करण्यात येणार असून केंद्रीय,प्रदेश पातळी आणि संघटनात्मक पातळीवरती ही सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप इच्छुकांना तीन कसोट्या पार कराव्या लागणार आहेत.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील भाजपने उमेदवारी निश्चित करण्यासाठी अशाच प्रकारचे सर्व्हेक्षण केले होते. हे सर्व्हेक्षण आधारभूत ठरवत विधानसभेची आणि लोकसभेची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. आता हाच फॉर्मूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देखील वापरण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!