वीस हजारांची लाच मागणाऱ्या पोलिस हवालदार विरुद्ध नाशकात कारवाई

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड- तकार अर्ज निकाली काढण्यासाठी दुकानदाराकडे २० हजारांची लाच मागणाऱ्या अंबड पोलीस ठाण्यातील हवालदाराच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचा चॉकलेट, बिस्कीट विक्रीचा व्यवसाय आहे. अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात फसवणूक केल्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला आहे. या तक्रारी अर्जात गुन्हा न दाखल करण्यासाठी व हा अर्ज निकाली काढण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उमाकांत रंगनाथ टिळेकर (वय ३९) यांनी तक्रारदाराला अंबड पोलीस ठाणे येथे पैसे घेऊन बोलावले तसेच साहेबांच्या नावाचा प्रभाव टाकून २० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखविली. 

यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा पारगे वालावलकर यांच्या व पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनोद चौधरी व अनिल गांगुर्डे यांच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता उमाकांत टिळेकर यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे आढळून आले. यावेळी केलेल्या कारवाईत आरोपी पोलीस हवालदार टिळेकर व दळवी यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून, पुढील निरीक्षण करून तपास सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!