मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क चौथे महिला धोरण- २०२४ जाहीर झाले आहे,त्याच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांनी प्रभावीपणे काम करावे.या माध्यमातून राज्य शासन महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करत असून मुंबई शहरातील महिलांसाठी सर्वसमावेशक नवीन ॲप तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दिले.
चौथे महिला धोरण -२०२४ जिल्हास्तरीय अंमलबजावणी सुकाणु समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधानसचिव नविन सोना, जिल्हाधिकारी आंचल गोयल,अपर जिल्हाधिकारी रवि रतन कटकधोंड,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले,समाजकल्याण अधिकारी रविकिरण पाटील, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, मुंबई शहर शैलेश भगत, मुंबई शहरच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.